कोकणखेडे ता.चांदवड जि. नाशिक
chdkokankhede1@gmail.com
सुचना :
कोकणखेडे हे महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यात चांदवड तालुक्यातील एक प्रगतशील व ऐतिहासिक गाव आहे. २०११ च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या सुमारे १८६१ आहे. गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा 1, अंगणवाडी केंद्र४ ,व्यायामशाळा १ अशी शैक्षणिक सुविधा उपलब्ध आहेत. तसेच महादेव मंदिर ,व हनुमान मंदिर हे प्रसिद्ध देवस्थान आहे. सामुदायिक सभामंडप, पाणीसाठवण,जलशुद्धीकरण प्रकल्प सार्वजनिक विहिरी व शेततळी अशा धार्मिक व सामाजिक सुविधा देखील आहेत.
गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून अधिकतर कांदा, गहू मका व भाजीपाला ही प्रमुख पिके घेतली जातात. कांदा व मका या पिकांच्या लागवडीमुळे गावातील शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते.
कोकणखेडे ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत. घरकुल योजना अंतर्गत शेकडो घरांना लाभ मिळाला आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत कोकणखेडे गावाने संपूर्ण खुले शौचमुक्त (ODF+) दर्जा मिळवला आहे. जलसंधारण व पाणीपुरवठा योजना अंतर्गत गावात पाणीपुरवठा नियमित करण्यात आला आहे. गावाला हक्कची विहीर मिळाली.ज्यात स्मार्ट ग्राम योजेनेचे बक्षीस मिळाले.तसेच गाव स्वच्छतेत हि उत्कृष्ट कामगिरी केली आहे.तसेच शाळा व अंगणवाडी डिजिटल करण्यात आले आहेत. गेल्या अवघ्या तीन वर्षात गावात १८००० झाडे लावून पर्यावरणाची काळजी घेण्याचे कार्य हि निष्ठेने पार पाडत आहे.
ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी मिळून गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणतात. ग्रामपंचायतीचे निर्णय लोकसहभागातून घेतले जातात.
आज आदर्श गाव म्हणून कोकणखेडे गावाकडे पाहिले जाते. कोकणखेडे गावाने एक आदर्श गाव म्हणून आपली एक ओळख निर्माण केली आहे.
कोकणखेडे हे गाव कृषीप्रधान आणि पारंपरिक जीवनशैलीसाठी ओळखले जाते. शेती हा गावकऱ्यांचा मुख्य व्यवसाय असून कांदा,गहू,हरभरा बाजरी, मका आणि विविध हंगामी भाजीपाला यांची लागवड येथे मोठ्या प्रमाणावर केली जाते. शेतीव्यतिरिक्त काही लोक दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन तसेच लघुउद्योग या क्षेत्रांतही कार्यरत आहेत.
गावात सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक परंपरा दृढपणे जपल्या जातात. वर्षभर साजरे होणारे सण-उत्सव, ग्रामदैवतांची पूजाअर्चा हे गावाच्या एकात्मतेचे प्रतीक मानले जाते. गावात विविध जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने आणि एकोप्याने राहतात . गणेशोत्सव, होळी, दिवाळी, नवरात्र यांसह स्थानिक देवतांच्या जत्रांना विशेष महत्त्व आहे.गावात हनुमान जयंतीच्या वेळी सात दिवस अखंड हरीनाम सप्ताह असतो या सप्ताहासाठी तरुण ऐक्य मंडळ व पंचक्रोशीतील भजनी मंडळ सहभागी होतात.
येथील लोक मेहनती, मदत करणारे आणि ‘अतिथी देवो भव’ या मूल्यांना आचरणात आणणारे आहेत. लोकसहभागातून काम ग्रामविकासात महिलांचा सहभाग स्वयंसाहाय्य गटांमुळे प्रकर्षाने जाणवतो. तरुण पिढी शिक्षण, खेळ व रोजगाराच्या संधी शोधून प्रगतीकडे वाटचाल करत आहे.
कोकणखेडे गावात लोकजीवनात पारंपरिक ग्रामीण ऐतिहासिक संस्कृतीसोबतच आधुनिकतेचा स्पर्शही आढळतो, ज्यामुळे गाव विकास आणि एकतेचा उत्तम संगम घडवते.एकंदरीत कोकणखेडे हे गाव ऐतिहासिक वारसा व भौगोलिकदृष्टीने समृध्द आहे.
"माझं गाव केवळ गाव नाही, तर जिल्ह्यातील आदर्श गाव आहे- स्वच्छतेत प्रगतीत आणि ऐक्यतेत पुढे असलेले खर प्रेरणास्थान "माझे कोकणखेडे
खंडेराव महाराज मंदिर – गावातील एक प्रमुख धार्मिक स्थळ. येथे दरवर्षी यात्रोत्सव आणि विविध धार्मिक कार्यक्रम भरवले जातात. हे मंदिर ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असून गावाच्या सांस्कृतिक एकतेचे केंद्र आहे.
मेसने डोंगर – कोकणखेडे गावाजवळील हा डोंगर निसर्गरम्य सौंदर्यासाठी ओळखला जातो. पावसाळ्यात हिरवीगार निसर्गरचना आणि थंडगार वातावरणामुळे हे ठिकाण प्रेक्षणीय ठरते.
भवानी माता डोंगर – गावाजवळील हा धार्मिक व ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचा डोंगर आहे. भवानी मातेस समर्पित मंदिर येथे असून यात्रेच्या काळात भाविकांची मोठी गर्दी असते.
राजमाता आहिल्याबाई होळकर काळातील बारव – गावात आजही होळकर राजवटीतील ऐतिहासिक बारव (पाणवठा) आहे. या भव्य बारवावर कोरीव काम व जुन्या वास्तुकलेचा प्रभाव दिसतो.
राजमाता आहिल्याबाई होळकर राजवाडा – गावात होळकर काळातील जुना राजवाडा व त्यातील अवशेष इतिहासाची साक्ष देतात. या वाड्यातील वास्तुकला व त्या काळातील पाण्याची सोय करणारी बारव आजही आकर्षण आहे.
आसपासची हिरवीगार शेती – कांदा, मका, गहू आणि हंगामी पिकांच्या लागवडीमुळे कोकणखेडे परिसर नेहमीच हिरवाईने नटलेला दिसतो. शेती हा केवळ उपजीविकेचा नाही तर गावाच्या सौंदर्यात भर घालणारा मुख्य घटक आहे.
कोकणखेडे या गावास ऐतिहासिक वारसा लाभलेला असून राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पदस्पर्शाने पावन भूमी असे सांगितले जाते.तसेच कोकणखेडे हे गाव राजमाता अहिल्यादेवी यांचे जहागिरीचे गाव असून गावात त्याचा पुरातन राजवाडा आजही वस्तुरूपात उभा आहे. वाड्यामधील लाकडी कोरीव काम आजही लक्ष वेधून घेते.वाड्यामध्ये चिरेबंदी दगडात बांधलेली मोठी बारव आहेत.वाड्याचा मुख्य प्रवेशद्वार लाकडी दरवाजा आजही शाबूत आहेत.हा वाडा राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी मुस्लीम समाजातील व अठरा पगड जातीचे सैनिक,कामगार, यांना भेट स्वरुपात देण्यात आला होता.गावात असलेली अहिल्यादेवी यांच्या काळातील बारव आजही वस्तुरूपात आहेत. या गावाच्या दक्षिणेला डोंगरवर भवानी मातेचे मंदिर आहेत.तसेच उत्तरेला ढाकरीचे (मेसन) डोंगर आहे.या डोंगराच्या पायथ्याशी गावाला पाणीपुरवठा करणारा तलाव आहे. कोकणखेडे गावाची लोकसंख्या सन २०११ जनगणनेनुसार १८६१ असून या गावात पुरातन राजमाता आहिल्यादेवी यांचा राजवाडा,तलाठी कार्यालय ,ग्रामपंचायत कार्यालय,अंगणवाडी, प्राथमिक शाळा, धार्मिकस्थळे इ.सुविधा अद्ययावत आहेत तसेच गावाच्या चारही बाजूने कच्चे व पक्के रस्ते आहेत. या गावात मराठा,हटकर,बौध्द,चर्मकार,सुतार,न्हावी,भिल्ल,मुसलीम तसेच सर्व जातीधर्मांचे लोक गुण्यागोविदाने एकत्र राहतात. गावाच्या मध्यभागी हनुमान महाराजांचे मोठे मंदिर बांधलेले आहे तसेच खंडेराव महाराज ,भवानी माता मंदिर बांधलेले आहे. या गावात सर्व सण-उत्सव मोठ्या आनंदाने साजरे केले जातात.तसेच वर्षातून एकदा खंडोबा महाराज देवाची यात्रा असते.
सन २०२३-२४ या वर्षाचा तालुकास्तरीय प्रथम क्रमांक चा आर.आर.आबा पाटील स्मार्ट गाव पुरस्कार
सन २०२३-२४ या वर्षासाठीच्या जिल्हास्तरीय आर.आर.आबा पाटील स्मार्ट ग्राम पुरस्कार
ISO नामांकन प्राप्त पंचायत
सन २०१८-१९ वर्षाचा तालुकास्तरीय सर्वूकृष्ट घरकुल पुरस्कार प्राप्त
चंदेरी कार्ड प्राप्त ग्रामपंचायत
श्री मच्छिंद्र आप्पासाहेब साबळे
गट विकास अधिकारी
चांदवड
श्री किशोर मच्छिंद्रनाथ लोहार
विस्तार अधिकारी
चांदवड
श्री. संदिप जिजाबाई नारायण शिंदे
श्रीमती .लताबाई बाजीराव अहिरे
श्रीमती सोनाली कमलबाई दिलीप देवरे
श्रीमती शालन वाळूबा गांगुर्डे
(सदस्य)
श्री. मच्छिंद्र वाळूबा गांगुर्डे
(सदस्य)
श्री.योगेश म्हातारबा शिंदे
(सदस्य)
श्री.भास्कर दिनकर वाघ
(सदस्य)
श्रीमती वैशाली नारायण माळी
(सदस्य)
श्री.दादा भागूजी बिडगर
(सदस्य)
श्रीमती सुंदराबाई नामदेव शिंदे
(सदस्य)
श्रीमती बेबीताई शिवनाथ संसारे
(सदस्य)
श्री. एळीजे शरद छबू
श्री.एळीजे मिलिंद शरद
श्री.नामदेव कारभारी शिंदे
श्रीमती कोमल राहुल गोविंद
1.श्री. सागर शेळके(ग्राम महसूल अधिकारी)
2.श्री. अनिल एळीजे (महसूल सेवक)
3.श्री. नंदकुमार भामरे (BLO)
4. रिक्त पद (पोलीस पाटील)
5.श्री. प्रवीण चौधरी (सहाय्यक कृषी अधिकारी)
🌾 ग्रामपंचायत क्षेत्रफळ
१२६०.७१ हेक्टर
🏢 वार्ड संख्या
३
👥 पुरुष संख्या
९४८
👥 स्त्री संख्या
९१३
👥 कुटुंब संख्या
३३१
👥 एकूण लोकसंख्या
१८६१